7000mAh बॅटरीसह मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन लॉन्च, 50MP कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्समुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता

Moto G37 Power: Motorola ने भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करत नवीन Moto G37 Power लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे 15 ते 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये तब्बल 7000mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्यामुळे दिवसभर गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडिया वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

आजच्या काळात ग्राहक फक्त कॅमेरा किंवा डिझाइन पाहून फोन घेत नाहीत, तर बॅटरी बॅकअप, प्रोसेसर आणि डिस्प्ले यांनाही तितकंच महत्त्व देतात. याच गोष्टी लक्षात घेऊन मोटोरोलाने हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर दीर्घकाळ सहज चालू शकतो.

50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर

Moto G37 Power मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे फोटो अधिक स्पष्ट आणि नैसर्गिक रंगांमध्ये टिपता येतात. यासोबतच 2-इन-1 लाइट सेन्सरचा सपोर्ट मिळतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून व्हिडिओ कॉलिंग आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी हा कॅमेरा चांगला पर्याय मानला जात आहे.

फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे मल्टिटास्किंग, गेमिंग आणि रोजच्या वापरात फोन स्मूथ परफॉर्मन्स देतो. 4GB आणि 8GB रॅम असे दोन पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. तसेच व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे रॅम आणखी वाढवता येते. Moto G37 Power

डिस्प्ले आणि डिझाइनही खास

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाची HD Plus LCD स्क्रीन दिली आहे. 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ मिळतो. याशिवाय 1050 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे उन्हातही स्क्रीन सहज दिसते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चा वापर करण्यात आला आहे. फोनचा डिझाइनही प्रीमियम लूक देणारा आहे. हातात घेतल्यानंतर हा फोन महागड्या स्मार्टफोनसारखा फील देतो, अशी प्रतिक्रिया अनेक टेक युजर्सकडून मिळत आहे.

7000mAh बॅटरीमुळे ग्राहकांमध्ये क्रेझ

या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 7000mAh बॅटरी. सध्या बाजारात बहुतेक फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळते, मात्र मोटोरोलाने ग्राहकांना अधिक पॉवरफुल पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सतत प्रवास करणारे, गेमिंग करणारे किंवा दिवसभर फोन वापरणारे ग्राहक याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

किंमत किती?

Moto G37 Power च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 18,999 रुपये मोजावे लागतील. 25 मेपासून या फोनची विक्री सुरू होणार असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्समध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.

या फोनला कोणाकडून टक्कर?

या किंमत श्रेणीत Moto G37 Power ला REDMI 15 5G, POCO M7 Plus 5G, REDMI Note 14 SE 5G आणि OPPO K14x 5G सारख्या स्मार्टफोनकडून स्पर्धा मिळणार आहे. मात्र मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले यामुळे मोटोचा हा फोन वेगळा ठरत आहे. जर तुम्ही 20 हजार रुपयांच्या आत नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि सर्वात जास्त महत्त्व बॅटरी बॅकअपला देत असाल, तर Moto G37 Power तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment